व्यक्तिमत्वाचे महत्त्व: स्पर्धा परीक्षेतील यशाचे रहस्य
UPSC/MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर व्यक्तिमत्वाची देखील मोठी भूमिका असते. चांगले व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य स्वरूप नव्हे, तर मानसिकता, आत्मविश्वास, आणि ताण-तणाव व्यवस्थापनाची क्षमता देखील. चला तर मग, व्यक्तिमत्वाचा अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षेत कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया.
व्यक्तिमत्व आणि अभ्यास
- स्वत:ची ओळख:
स्वत:च्या स्वभावाची आणि अभ्यास पद्धतींची ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना पहाटे अभ्यास करणे सोयीस्कर वाटते, तर काहींना रात्री अभ्यास करणे सोपे जाते. आपण कोणत्या पद्धतीने जास्त प्रभावी आहोत हे ओळखल्यास, अभ्यासाची कार्यक्षमता वाढते. - आत्मविश्वास:
आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा महत्वपूर्ण भाग आहे. अभ्यास करताना लहानसहान यशांचा आनंद घ्या आणि स्वत:वर विश्वास ठेवा. आत्मविश्वासामुळे परीक्षेच्या ताणातून बाहेर पडता येते आणि तयारीत सातत्य ठेवता येते. - धैर्य आणि संयम:
स्पर्धा परीक्षा म्हणजे दीर्घकालीन प्रयत्नांची गरज असते. धैर्याने आणि संयमाने पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. सततच्या अपयशामुळे निराश होऊ नका, तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा.
व्यक्तिमत्वाचा अभ्यासात आणि तयारीत उपयोग
- तणाव व्यवस्थापन:
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तणाव येणे सामान्य आहे. तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानधारणा, योगा, आणि शारीरिक व्यायाम यांचा समावेश करा. नियमित ताणतणाव व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते. - सकारात्मकता:
नेहमी सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मकता तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करा. - समन्वय आणि शिस्त:
नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा. शिस्तबद्धतेने कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासात सातत्य ठेवता येते. - समाजाशी संवाद:
इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. ग्रुप स्टडीचे आयोजन केल्यास आपल्या ज्ञानात वाढ होऊ शकते.
व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काही टिप्स
- स्वत:शी संवाद:
स्वत:शी संवाद साधा आणि आपल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करा. आपल्या गुणांवर विश्वास ठेवा आणि सतत आत्मपरीक्षण करा. - माहितीचा वापर:
जास्तीत जास्त माहिती वाचून आणि ऐकून तुमच्या ज्ञानात भर घाला. विविध स्रोतांमधून माहिती गोळा करा आणि त्याचा वापर करा. - सकारात्मक सवयी:
सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, आणि संतुलित आहार घेणे या सवयी अंगीकारा. या सवयींमुळे तुमची ऊर्जा वाढते आणि एकाग्रता सुधारते. - समय व्यवस्थापन:
वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक विषयासाठी वेळ निश्चित करा आणि त्याचे पालन करा. - आत्मपरीक्षण:
आपले यश आणि अपयश यांचे नियमित आत्मपरीक्षण करा. आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे हे ओळखा आणि त्यावर काम करा.
ताण कधी येतो?
समजा एखाद्याचा अभ्यास होत नाहीये आणि मागच्या वेळी त्याला पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागला असेल, तर आपण असा निष्कर्ष काढतो की ह्यावेळी हि अभ्यास नाही झाला तर मी परत नापास होणार. मग त्याच्या समोर दोन पर्याय असतात:
- चुकीच्या पद्धतीने तणाव घालवणे.
- योग्य पद्धतीने तणावाचा सामना करणे.
चुकीच्या पद्धतीने तणाव घालवणे म्हणजे काय?
- कुठल्या तरी वेगळ्याच विषयात मन लावून घेणे, आणि आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत या वास्तविकतेकडे पाठ फिरवणे.
- आजून परीक्षेस खूप वेळ आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे.
- परीक्षा पद्धतीत दोष आहे, शिक्षण पद्धतीत दोष आहे असे मानून, स्वतःला योग्य सिद्ध करून तणावमुक्त होणे.
- अधिकारी झाल्याची स्वप्ने रंगवत बसणे. (असे केल्याने तात्पुरता ताण जातो).
व्यक्तिगत पातळीवर असे अनेक नुक्से वापरून विद्यार्थी स्वतःला तणावमुक्त करून घेतात. मग योग्य पद्धत काय आहे?
सर्वप्रथम पहिली पायरी आहे, तणाव ओळखणे. तणाव जर ओळखताच आला नाही तर त्याचाशी सामना कसा करणार? त्यामुळे आपल्या आलेला ताण ओळखता आला पाहिजे. तणावाची लक्षणे आपल्यावर आपण सावध झालो पाहिजे.
त्यानंतर त्या ताणाचा सामना करणे ही दुसरी पायरी असते.
तणावाचा सामना तीन पातळ्यांवर करायचा असतो:
- ऍक्टिव्हिटी
- विचार
- भावना
यशस्वी व्यक्तिमत्वाच्या गुणधर्म
- आत्मविश्वास:
आत्मविश्वास हे यशस्वी व्यक्तिमत्वाचे प्रमुख गुण आहे. आत्मविश्वासाने कोणत्याही आव्हानांना सामोरे जाता येते. - ताण-तणाव व्यवस्थापन:
ताणतणावाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्यास परीक्षेच्या ताणातून सहज बाहेर पडता येते. - सकारात्मक दृष्टिकोन:
कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याची क्षमता असली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनामुळे कोणत्याही अडचणींवर मात करता येते.
[] यशस्वी विद्यार्थ्यांची गोष्ट
मित्रांनो, चला तर एक कथा सांगतो जी तुम्हाला व्यक्तिमत्वाचा अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षेत कसा फायदा होतो हे दाखवेल.
कथेमध्ये दोन मित्र आहेत. राहुल आणि मनोज (बदललेले नाव).
दोघेही दिल्लीला UPSC परीक्षेची तयारी करत होते . मनोजची कौटुंबिक पार्श्वभूमी साधारण होती, त्याच्या घरचे आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तर, राहुल हा खासदारांचा मुलगा आणि त्याच्या घरातील बरेच लोक अधिकारी पदावर कार्यरत होते. दोघांनी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. वर्ष दोन वर्ष अभ्यास केला.
दोघे हि पूर्व परीक्षा पास झाले —>
मुख्यपरीक्षा पास झाले —>
मुलाखत दिली.
निकाल लागला पण दोघांची निवड हुकली. मनोज दिवसभर तणावात होता. दिवसभर त्याच मन थाऱ्यावर नव्हतं. वेग वेगळ्या मित्रांना भेटून त्याने तणाव घालवल्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी संध्याकाळी तो राहुलच्या फ्लॅटवर गेले.
तिथे गेल्यावर राहुलच्या मित्रांनी सांगितलं कि राहुल ने सकाळपासून स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतले आहे. मनोजला राहुलची चिंता वाटायला लागली. त्याने रूमचे दार ठोठावले. राहुलने शांतपाने दरवाजा उघडला आणि मनोजला सांगितले कि आपण उद्या सकाळी भेटूया.
मनोज गोंधळलेल्या मनःस्थितीत स्वतःच्या फ्लॅटवर गेला . रात्रभर त्याला राहुलची चिंता वाटत होती.
सकाळी सकाळी उठून तो मनोज कडे गेला. राहुल अगदी उत्साहात योग करत बसला होता. हे बघून मनोजला आश्चर्य वाटले.
त्याने राहुलला विचारले,
“राहुल दोन वर्ष मेहनत करून सिलेक्शन झाला नाही. तुला ह्या गोष्टीचा ताण आला नाही का? तुला का ताण येणार म्हणा, तू श्रीमंत आहेस. तुला तर गरज पण नाही अभ्यासाची.”
राहुलने उत्तर दिले,
“आधी मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो, हे बघ मनोज मला ताण आला. पण काल दिवसभर मी स्वतःला वेळ दिला. स्वतःशी बोललो. संध्याकाळी मी पुढील वर्षात ‘काय काय करायचं’ याच नियोजन केलं. आणि आज सकाळी मी परत माझ्या दैनंदिनीला सुरुवात केली. स्वतःशी बोलून मी नकारात्मक विचारांपासून स्वतःला मुक्त केले. असे नाही कि काल लगेच माझा ताण कमी झाला. पण काल मी त्याचा प्रभाव कमी केला. जास्त भावनिक न होता संतुलित राहण्याला महत्व दिले. आता माझ्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीतून माझा उरलेला ताण आठ दहा दिवसात कमी होईल. आणि अभ्यास तर चालू आहेच.”
आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, ” यश मिळवण्याची इच्छा गरिबाला आणि श्रीमंताला सारखीच असते. ते ना मिळाल्यावर होणारे दुःख सारखेच असते. निकाला नंतरचा एक दिवस तुझ्या साठी जितका त्रासदायक होता तेव्हडाच माझ्यासही त्रासदायक होता. फरक एव्हढाच आहे कि तुला तुझ्या भविष्याची चिंता आहे. आणि मला तितकीशी नाही . पण तुला असणारी चिंता आणि मनाविरुद्ध लागलेल्या निकालामुळे मला आलेला ताण हा सारखाच त्रासदायक होता. पण मी त्या त्रासच सामना केला. तू तुझ्या चिंतेचा आणि तणावाचा सामना केला? कि भावनिक होऊन कोलमडून बसलास?”
येणाऱ्या परिस्थितिचा सामना करणे न करणे हे गरिबी किव्हा श्रीमंतीवर ठरत नसते. तरी ते व्यक्तीच्या स्वभावावर आणि व्यक्तिमहत्वावर ठरत असते.
“विचार कर आणि परत अभ्यासाला लाग.”
मनोजला त्या दिवशी राहुलच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण पुढील दिवसांत राहुलने स्वतःला दिलेली वाचन पळाले. ते बघून मनोजने राहुलला फॉलो करायचे ठरवले.
राहुल रोज पहाटे लवकर उठायचा २० मिनिटे योग आणि नियमितपणे व्यायाम करायचा. व्यायामामुळे त्याला ताजेतवाने वाटायचे आणि त्याची एकाग्रता सुधारायची. अभ्यासात त्याने वेळेचे नियोजन केले होते आणि प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ ठरवली होती. त्यामुळे त्याच्या अभ्यासात सातत्य होते.
योगमुळे त्याचे तणाव व्यवस्थापन चांगले झाले आणि परीक्षेच्या ताणातून बाहेर पडणे सोपे झाले. त्याने आपल्या मित्रांसोबत ग्रुप स्टडीचे आयोजन केले आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न केला.
राहुलने नेहमी सकारात्मक विचार ठेवले. अपयश आले तरी त्याने निराश होऊन न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला. आत्मपरीक्षण करून आपल्या त्रुटी सुधारल्या आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
अखेर, राहुलने आणि मनोज यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांच्या या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे चांगले व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिमत्वाचा विकास केल्याने तुमच्या अभ्यासात सुधारणा होईल, तणाव आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करता येईल, आणि यशाच्या दिशेने तुमचा प्रवास सुसह्य होईल.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत आणि आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य आहे. चला तर मग, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून यशाच्या दिशेने पावले उचला.
Leave a Reply