Success philosophy and sustainable endeavours
यश, तत्त्वज्ञान आणि शाश्वत प्रयत्न (कथा)
१) आपण बनवलेल्या योजना ह्या अंतिम असतात का?
२) योजना पूर्णत्वास नेणे खरंच आपल्या हातात असते का?
कधी कधी जास्त काम झालं आणि तणाव आला की तणाव घालवण्यासाठी म्हणून मी शहरा बाहेरील तलावकाठाच्या गार्डन मध्ये जाऊन बसतो.
आजही
माझं रोजचं काम संपवून मी संध्याकाळी पाच वाजता त्या गार्डन मध्ये बसलो होतो. सात वाजेनंतर माझे सेशन सुरू होणार होते. थोडसं रिलॅक्स होऊन परत माझ्या कामावर निघायचं असं ठरवून इथं आलो होतो. काल मी ‘गॉडस् सिस्टीम’ याबद्दल विचार करत होतो. गॉडस् सिस्टीम बद्दल विचार करताना एक विचार मनात आला होता, आपली जी बिलिफ सिस्टीम आहे. त्यात आपण काय मानतो? घडणाऱ्या घटनांन मागे आपण काय कारण असल्याचे समजतो?
थोडे चिंतन आणि अभ्यास केल्यावर लक्षात आहे की,
प्रकार १ चे लोक घडणाऱ्या घटनांनामागे देवाला कारणीभूत ठरवतात.
प्रकार २ चे लोक त्या घटनांसाठी स्वतःच्या कर्माला कारणीभूत ठरवतात.
खरंच आपण आपल्या कृत्यांना नियंत्रित करून हवे ते रिझल्ट प्राप्त करून घेऊ शकतो का?
याचं उत्तर नाही किंव्हा हो नाहीये.
तर चला आज याच गोष्टीचं उत्तर आपण शोधुया.
वास्तवात, कुठलही यश मिळणे वा न मिळणे. हे बाह्य प्रभाव(external influence) आणि स्वतःच्या कृती यांचे गणित असते.(असं मी मानतो)
सर्वस्वी आपण बाह्य पराभवावर अवलंबून राहू शकत नाही किंव्हा पूर्णपणे, स्वतच्या कृती वर अवलंबून राहू शकत नाही.
आपल्या प्रत्येकाच्या बीलिफ सिस्टम मध्ये घटनांच्या रिझल्ट बाबत आपण एक मत बनवलेले असते. ते वरील पैकी एक असते. किंव्हा वरील पैकी एक असे वेळे नुसार बदलत असते. प्रत्येक माणूस काम करतो काम करत करत कधी यशस्वी होतो कधी अपयशी होतो. काहीतरी मिळवतो किंवा काहीतरी त्याला गमवावे लागतं.
कुणासोबत काय घडावं आणि कुणासोबत काय घडू नये, हे ठरलेलं असतं?
कारण आपण काही कृती करत असलो तरी जगातील इतर लोक सुध्दा काही न काही कृती करत असतात. त्यांच्या कृतीचा परिणाम आपल्या कृतीवर होत असतो. त्यामुळे पूर्णपणे मिळणारे परिणाम(रिझल्ट्स) आपल्या कृतिवरच आहे हे आपण म्हणुच शकत नाही. तसेच आपण दुसऱ्या कुणाला दोष देऊ शकत नाही, किंव्हा कुणाला त्यांच्या कृती करण्यासाठी प्रवृत्त किंव्हा परावृत्त करू शकत नाही.(अपवादात्मक परिस्थितीत सोडून, आपण दररोज तसे करू शकत नाही.)
ह्याच वस्तविकातेतून(फॅक्ट) एक गोष्ट आपल्या मनात बळावते ती हे जे काही जगामध्ये घडतं आहे, त्यामध्ये कुणीतरी असेल.
का माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज असल्या तरी हवे असलेले रिझल्ट्स प्रत्येक वेळा मिळत नाही.
कुणासोबत काय घडावं आणि कुणासोबत काय नाही हे माझ्या हातात नाही?
मग मी माझे प्रयत्न सोडून द्यावेत का?
आयुष्याच्या चित्रपटाची कथा ठरवणार कुणी असतं का?
खूप वेळा मी निरीक्षण केलं की प्रत्येक एखाद्याने ठरवलेल्या गोष्टी तो पूर्ण करू शकेल किंवा पूर्ण करू शकणार नाही, हे त्याचे हातात नसतंच.
मग कुणी कितीही श्रीमंत किंव्हा बुध्दीमान व्यक्ती असला तरी.
आपण जे करतोय —> तो आपला प्लॅन, पूर्णपणे सक्सेसफुली एक्झिक्युट होतो की नाही याची शाश्वती असते?
जर असेल तर असा कोणता फॉर्मुला आहे ज्याने आपण ठरवलेलं आहे तो प्लॅन पूर्ण होईलच.
स्वानुभवाने सांगतोय, कुठेतरी माझ्या लक्षात आलं की आपण कितीही एखादी गोष्ट परफेक्ट करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला हवे असलेले रिझल्ट मिळतीलच असं नाही.
*अशी कुठलीतरी गोष्ट आहे जी आपला प्लॅनला सक्सेसफुली पूर्ण होण्यापासून रोखू शकते किंवा आपल्या एखाद्या प्लॅनमध्ये ज्यात आपण पूर्णपणे प्रयत्न जरी करत नसलो तरी त्या प्लॅनला सक्सेसफुल करू करू शकते.( हे निरीक्षण आहे)
मग ती कोणती गोष्ट असते? तो कोणता देव असतो का? किंवा ती कुठली कधी शक्ती असते का?
बॅक तो द पॉइंट
तर आपण कुठे होतो?
आपण त्या गार्डनमध्ये, —-> त्या गार्डन मध्ये मी बसलेलो होतो.
गार्डन हे खूप छोटं होतं आणि त्याला दोन गेट होते जवळजवळच असणारे गेट हे कायम उघडे असायचे. पण आज येथे एक बकऱ्या हकणारी वृध्द महिला आलेली होती आणि ती एका दुसऱ्या गेटवर बसलेली होती. ती ज्या गेट शेजारी बसलेली नाही तो गेट तिने बंद केला होता. का तर तिच्या बकऱ्या चरत-चरत बाहेर परत कुठे दुसरीकडे जाऊ नये यासाठी.
मग थोड्या वेळाने जो गेट उघडा होता त्या गेट मधून एक कुत्रा आत आला आणि तो कुत्रा उघड्या असलेल्या गेट कडून चालत चालत बंद गेतपर्यंत आला. त्या कुत्र्याने तिथे येऊन आजूबाजूला बघितलं, थोडा थांबला आणि तिथून मागे निघून गेला.
गेटला कुलूप किंवा कडी घातलेली नव्हती, छोट्याशा धक्क्याने तो गेट उघडू शकणार होता. पण त्या कुत्र्याकडे ती विचार करण्याची क्षमता नाही की मी छोट्याश्या धक्क्याने हा गेट उघडून पलीकडे जाऊ शकतो आणि म्हणून तो परत गेला.
तो कुत्रा होता, एक प्राणी होता. निसर्गाने किंव्हा देवाने त्याला विचार करण्याची क्षमता दिलेली नाही.(किंव्हा तसा विचार त्याने केला नाही).
बंद असलेला गेट ही एक नैसर्गिक घटना म्हणून त्याने ती accept केली आणि तो माघे फिरला.
पण माझ्या बाबतीत तसा नव्हतं. माझ्यात विचार करण्याची क्षमता आहे. मी सरळ बंद गेट उघडून बाहेर गेलो.
तर आपण आता परत आपण जे प्रश्न अनुत्तरित सोडले होते तेथे येऊया.
ह्या घटने मागे कोण होता?
मी ऑलरेडी माझी बुध्दी चालून निष्कर्ष काढला होता की त्या वृध्द महिलेने तो गेट बंद केलेला होता.
कुत्र्याला ते माहीत नाही. कदाचित त्याला असे ही वाटले असेल की देवाने तो बंद केला.
(इथे कुठेही कुत्रा आणि माणूस अशी तुलना चालू नाहीये. कारण जर शिकाऊ कुत्रा असता तर त्याने तो गेट उघडला असता. आपण perticular दृष्टिकोनातून बघू)
जर दररोज त्या गार्डन मध्ये तिथे जात आहे. आणि गेट बद्दल माझ्यासोबत व त्या कुत्र्यासोबत तीच (गेट बंद असण्याची) घटना घडत आहे. तर मी हुशार या नात्याने रोज रोज गेट उघडण्याची तसदी न घेता उघड्या असलेल्या गेट ने येजा करेल. आणि कुत्र्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुत्रा कदाचित हळू हळू गेट उघडायला शिकेलही.
पण गोष्टीत खरा ट्विस्ट पुढे आहे:
उगड्या गेट ने ये जा केल्याने मला २ किमी लांब फेरा मारून जावे लागेल.
तिथे माझा लॉस होत आहे.
आता एवढं सगळा वाचून तुम्ही म्हणाल की हा काय मूर्खपणा आहे. जर तुम्हाला माहित आहे. की हा गेट बंद आहे, आणि तो तुम्ही उघडू शकता तर तुम्ही रोज तो गेट उघडून दररोजच्या रस्त्याने गेलं पाहिजे. तुमच्या पेक्षा तर तो कुत्रा हुशार आहे मग😂😂😂😂.
मित्र आणि मैत्रिणींनो,
प्रॉब्लेम इथेच आहे. आपल्याला माहीत आहे, रोज थोडा थोडा अभ्यास केला तर पहिल्या नाही तर दुसऱ्या, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या attempt मध्ये आपण परीक्षा पास होऊ शकतो, आपल्या हिमतीच्या जोरावर आपण कधी कधी सुरवातीला पूर्व परीक्षा पास देखील होतो. कारण आपल्याला माहीत असते की ही परीक्षा कशी पास करायची आहे.
पण ती गोष्ट परत परत करायला लागली की आपण दुसरा रस्ता निवडतो .
एक तर परीक्षा देणे सोडण्याचा किंव्हा अभ्यास न करण्याचा.
ह्या कथेत दोन कॅरेक्टर आहे. एक कुत्रा एक म्हणजे माणूस.
१) परत परत तीच गोष्ट करावी लागणार, तरी दुसऱ्या दिवशी गेट बंदच राहील, असे म्हणून रस्ता बदलणारा तो माणूस.
२)हळू हळू प्रयत्न करून गेट उघडायला शिकलेला आणि दररोज त्याच गेट मधून पलीकडे जाणारा कुत्रा.
पण इथे अजून एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे तिसरं कॅरेक्टर. ते म्हणजे एक गाढव. ते गाढव रोज उघड्या गेट मधून येत असे. बंद गेट कडे बघत असे. आणि परत जात असे.
या गाढवा विषाई मी जास्त काही बोलणार नाही. फक्त त्या कुत्रा विषयी आणि माणसं विषयी बोलणार.
तात्पर्य: कोण अभ्यास करण्यासाठी काय योजना(strategy) वापरतो. एखाद्याची पोस्ट क्रॅक करण्यामागे मागे नेमक कारण काय आहे हे माहीत असणं पुरेस नाही. किंव्हा कुणाला तरी पोस्ट मिळाली ती नशिबाने मिळाली असं म्हणणे देखील चांगले किंव्हा वाईट नाही. महत्त्वाचं आहे ते तुमचे सतत चे प्रयत्न. त्यासाठी काय करता येईल ते करण्याची तयारी ठेवायची, पण जे ही प्रयत्न करत आहात ते रोज करायचे.
धन्यवाद!
[टीप १: एक इंग्लिश कुत्रा असा ही होता ज्याला त्याचा मालक पट्टा धरून गेट उघडून पलीकडे घेऊन जायचा. पण अश्या आळशी कुत्र्यांना आपण आपल्या कथेत महत्त्व देत नाही🙂]
[टीप २: ही गोष्ट खूपच किचकट आणि गोंधळलेली वाटत असेल कदाचित. पण मुळात ही गोष्ट नोबेल किंव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्यासाठी लिहिली गेलेली नाही.
ही गोष्ट लिहिण्यास कारण की, ही गोष्ट परत परत वाचून तुम्ही विचार करवा, आणि अभ्यासातील सातत्य येण्यासाठी काय करावं लागेल ते ह्या गोष्टीत शोधावं.]
Leave a Reply